एलआयसी अभिकर्त्यांचा एक दिवस विश्रांती निषेध आंदोलन

0
71
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी / पंकज गोडबोले

आर्वी : भारतीय जीवन विमा निगम आर्वी शाखेच्या अभिकर्ता बंधूंनी आय आर डी ए आणि विमा निगम ने घेतलेल्या ज्याचक नियमाच्या विरोधात आज दिनांक 19 मार्च बुधवार ला शाखेसमोर एक दिवसीय ठिया आंदोलन करून काम बंद विश्राम दिवस घोषित करून निषेध व्यक्त केला. या संदर्भात देशातील सर्व अभिकर्ता एकत्रित येऊन भारतीय जीवन विमा निगम व आय आर डी ए ने घेतलेल्या नियमाच्या विरोध करण्याकरिता रामलीला मैदान दिल्ली येथे एक दिवसीय देशव्यापी निषेध आंदोलन घेण्यात आले आहे. याकरिता आर्वी शाखेतील १५ अभिकर्त्या सहभाग नोंदविण्या करिता दिल्ली येथे रवाना झाले आहे. भारतीय जीवन विमा निगम व आय आर डी ए यांच्या ज्याचक नियमामुळे विमा ग्राहक व अभिकर्त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. यामध्ये विमा ग्राहकांना वाढीव विमा हप्ता, वयाची मर्यादा, विमा हप्त्यावरील जीएसटी कर, कमी केलेला ग्रेस कालावधी याचा नाहक भुरदंड सोसावा लागणार आहे. तसेच अभीकर्त्यांचे कमी केलेले कमिशन याचा फटका सर्वांना होणार आहे या ज्याचक अटी रद्द करण्यात करिता देशभरातील सर्व एलआयसी अभिकर्त्यांनी प्रत्येक शाखा स्तरावर एक दिवसीय काम बंद विश्राम दिवस घोषित करून निषेध आंदोलन केले. या आंदोलनामुळे विमा निगमच्या व्यवसायाला लाखो रुपयाचा आर्थिक नुकसानाचा फटका बसला आहे. तळागाळातील ग्राहकांचे हित जोपासुन केलेले नियम अटी त्वरित रद्द करावे अशी विमा ग्रहाक अभिकर्ता संघटनेच्या मागण्या आहे.

या काम बंद विश्राम दिवस ठिय्या आंदोलनाला प्रशांत कदम, भुरे पाटील मनोज शेंद्रे, बाल पांडे सर, गौरव बारंगे, उमेश ठाकरे, रंजीत वावरे,विनोद अंभोरे, विजय नांदणे, नरेश अग्रवाल, अमर कडू, नरेश वानखडे, विकास गवळी, सुरेश दुधाने,नितीन शेगोकार, नितीन लक्षणे,पोतदार सर, रोशन सवाळे, दुधानी, श्रीकृष्ण इंगोले, संजय देशमुख व असंख्य या आंदोलनाला अभिकर्ता सहभागी झाले होते.

veer nayak

Google Ad