आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची फाल्गुन वैद्य तृतीया या तिथीनुसार 17 मार्चला तिथीनुसार जयंती आर्वी आगारात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आशिष मेश्राम, आगार व्यवस्थापक साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पुजन करून हारार्पण करण्यात आले. त्याप्रमाणेच बसस्थानक आर्वी येथे सुद्धा शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचं पुजन करून हारार्पण करण्यात आले. यावेळी श्री कांबळे साहेब सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, वाहतूक निरीक्षक सुरज बागडे, अंभोरे साहेब, वाहतूक नियंत्रक पचारे साहेब, नारायण ठाकरे, अनिल गुल्हाने, राजू गांडोळे , सचिन जगदळे, सागर गोंडसे, राहूल ईथापे गणेश गेडाम, नरेश उईके , रवी धानके, माळोदे भाऊ, ,रवि काळे ,मृणाल पखाले, विनोद खारकर, अरूण माहोकार व मोठया प्रमाणात कर्मचारी व प्रवाशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.