आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये महिलांचे आरोग्य कसे सक्षम होईल आणि तसेच आजच्या समाजाला महिला ही कशी असावी, या दोन विषयावर महालक्ष्मी बचत गट यांनी आपल्या विचारांची मांडणी करून आपले विचार या प्रोग्राम मध्ये व्यक्त केले.
तसेच कार्यक्रमाचे आयोजन शुभांगी गाठे व नीता लांडगे यांनी केले अध्यक्ष म्हणून फॉरेस्ट ऑफिसर मुन मॅडम सोबतच प्रमुख पाहुणे संगीता ताई गोरे ग्रामसेविका, तसेच अंगणवाडी सेविका चंदाताई देशमुख मदतगार म्हणून छायाताई हांडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.. तसेच कार्यक्रमाला उपस्थित धोंगडे मॅडम , हीवसे मॅडम , सोबतच ब्रह्मकुमारी सीमा दीदी व सुनीता दीदी यांनी स्त्रीला मनावरती ताबा ठेवून जीवन कशा पद्धतीने जगायचे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे चिमुकल्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला संचालन प्रिया भगती ने केले ,कार्यक्रमाला सहकार्य व उपस्थित असलेल्या महिला मोना धानोरकर, निकिता अमझरे, शुभांगी गोमासे, प्रांजली धोंगडे, सुषमा सिंगरोल, संध्या जवंजाळ मॅडम, सोनाली हिवसे, रंजना मानकर, माधुरी गोडबोले, सुवर्णा बोबडे, रिता मल्हेवार , शारदा सिद्धांम, वैशाली पडोळे मनीषा पडोळे , कार्यक्रमाचे अस्मिता विघ्ने यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.