धामणगाव रेल्वे वार्ताहर
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन “कृषी गंधर्व” दिनाक २३/०२/२०२५ ते २५/०२/२०२५ दरम्यान विविध उपक्रमांद्वारे उत्साहात संपन्न झाले.
संमेलनाचे उद्घाटन सन्माननीय सहयोगी अधिष्ठाता(शिक्षण) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला डॉ राजेंद्र गाडे, यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ.श्रीकांत काकडे, प्राचार्य डॉ सी यु पाटील, श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट विश्वस्त शरद राव इंगळे सुभाष मुरे, रामेश्वर नागपुरे दीपक बोंद्रे, प्रा.वृशाली देशमुख, उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलन कृषी गंधर्व मध्ये विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, क्ले मॉडेलिंग, गीत गायन स्पर्धा, फॅशन शो, फिश पॉड, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री राजूभाऊ भोगे, तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय स्टेट बँक अंजनसिंगी शाखा व्यवस्थापक आनंद चित्ते, प्राचार्य डॉ. सी. यु पाटील प्राचार्य डॉ.सुभाष मुरे, सौ शारदाताई गायके,प्रा. योगेश मुंदे, डॉ शरद नायक, प्रा दीपक बोंद्रे, प्रा. वृषाली देशमुख स्नेहसंमेलन विद्यार्थी प्रतिनिधी तनुज नासरे व कुमारी अंजली विंचुरकर उपस्थित होते. दीप प्रज्वलन फोटो पूजन व हार अर्पण नंतर पाहुण्यांचा सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ, व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर स्नेहसंमेलन पूर्वी आयोजित क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलनातील विविध विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा सुद्धा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी श्री आनंद चित्ते व प्राचार्य डॉ. सी. यु पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन दीपक बोंद्रे यांनी केले .
स्नेहसंमेलनाचे यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदू शेठ चव्हाण, महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी राजूभाऊ भोगे, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सी. यु. पाटील, स्नेहसंमेलन प्रभारी प्रा योगेश मुंदे ,डॉ. शरद नायक, प्रा दीपक बोंद्रे, प्रा वृषाली देशमुख, सुहास आप्तुरकर, प्रमोद नागपुरे, रामकृष्ण नागपुरे, हरी भाऊ नागपुरे सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.