असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत धामणगाव दुमदुमले…. शहरात शिवजयंती मिरवणुक पुष्पा व कालाहंडी कट्टपा ठरले विशेष आकर्षण…

0
30
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,ता.१९:- सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजीत शिवजयंती निमित्त धामणगांव शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी शहर व ग्रामीण भागातील जनतेनी प्रचंड गर्दी तर विशेष: महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता.


सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या आयोजनातून शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती शोभायात्रा काढण्यात येते.दरम्यान दरवर्षी वेगवेगळी कला पथके,आकर्षक देखावे सदर शोभायात्रेची शोभा वाढवितात.मागील काळात शिवजयंती २०२३ ला हरियाणा येथील सुप्रसिध्द बजरंगबली, २०२४ मध्ये वाराणसी येथील अघोरी तर या वर्षीच्या मिवणुकीत ओडिशा येथील कालाहंडी कट्टपा व वर्धा येथील पुष्पराज (अजय मोहिते) यांच्या डायलॉगबाजीने व नृत्य शहरातील चौकाचौकात आकर्षणाचे केंद्र ठरले.मिरवणुकीत फडकत असलेल्या शिवपताका,शिव छत्रपतींचा व राजमाता जिजाऊ यांच्या जीवंत देखाव्यांनी उपस्थीत शिवप्रेमींची मने जिंकली.यावेळी अमरावती येथील वक्रतुंड ढोल पथक,पुसद येथील सैलाणी ढोल,घोडे, बँजो, दाभा येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी बाल वारकरी दिंडीने शिवजयंतीची शोभा वाढवली.दरम्यान डी.जे च्या तालावर नाचत सर्व उपस्थितांनी शिवजन्मोत्सवाचा आनंद साजरा केला.या शोभायात्रेसमोर वर्धा येथील श्वेता नागतोडे यांनी पालखी समोर रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले होते.महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले त्याच विचाराने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात.
आमदार प्रताप अडसड,खासदार अमर काळे,कृषि उत्पन्न बाजार समितिच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे,जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक श्रीकांत गावंडे, परीक्षीत जगताप यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांनी या उत्सवाला हजेरी लावली.असंख्य शिवप्रेमींनी महाराजांच्या घोषणा देत मान्यवरांचे स्वागत केले दरम्यान खासदार अमर काळे यांनी वाद्यांच्या तालावर ठेका धरला.दत्तापुरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरापासून शोभायात्रेला सुरवात झाली कॉटन मार्केट चौक,शहीद भगतसिंग चौक,महात्मा गांधी चौक, सिनेमा चौक, नूतन चौक, शास्त्री चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता।करण्यात आली.तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनीसुद्धा मिरवणूकीत सहभाग घेत सांगता होई पर्यंत आपली उपस्थिती दर्शवली.
————————————
धामणगाव शहरात श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य स्मारकाचे काम सुरू झाले असून ६ जून राज्याभिषेक दिनापर्यंत रायगडा वरील प्रतिकृती पुतळा उभारल्या जाणार असल्याची ग्वाही यावेळी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने उपस्थित शिवप्रेमींना दिली.

veer nayak

Google Ad