आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : उपजिल्हा रुग्णालय येथे गंभीर रुग्णा करिता कुठलीही सोय नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली नाराजी १७/०२/२०२५ ला जयसिंग मेरचंद जाधव रा. हराशी (वाढाेणा सर्कल) ता. आर्वी, जि. वर्धा (वय ९७) या रुग्णाला छातीत निमोनिया झाल्यामुळे अतिशय गंभीर प्रकृती बिघडल्याने कुठेही रेफर न करता थेट जवळेकर हॉस्पिटल गाठले डाॅ. जवळेकर यांनी रुग्ण ९७ वर्षाचा वयवृद्ध असल्यामुळे सामाजिक बांधिलकीतून जातीने लक्ष देऊन रुग्णाची घेतली काळजी
डॉ.जवळेकर यांच्या अथक प्रयत्नातुन रुग्ण दोन दिवसात केला रिकव्हर रुग्ण बरा झाल्याने १९/०२/२०२५ ला दिला डिस्चार्ज रुग्णाच्या नातेवाईकांनी डाॅ. रोशन जवळेकर यांचे व हॉस्पिटल स्टॉफचे मानले आभार..!