आर्वी, प्रतिनिधी/
आर्वी : बस स्थानकाला लागून असलेल्या अस्थाही हॉटेलवर अचानकच उदईने पोखरलेले कडुलिंबाचं झाड कोसळल यामध्ये हॉटेल मालक आकाश संजय काळे हे हॉटेलमध्ये ग्राहकी करत असतांना लहान मुलगा व पती-पत्नी नाश्ता करीत आले असता काही वेळातच अचानक उदईने पोखरलेले झाड हॉटेलवरच्या छतावर येऊन पडले नाश्ता करत असलेले पती-पत्नी व मुलगा हॉटेल मालक हे थोडक्यात बचावले असून जीवित हानी टळली मात्र महिला किरकोळ जखमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे दाखल करण्यात आले. आर्वी तळेगाव रोड व बस स्थानक जवळील परिसर हा अतिशय वर्दळीचा असल्याने काही झाड रस्त्यात येत असल्याने झाड उदईने पोखरले असल्यामुळे अचानक झाड कोसळल्याने बसस्थानक परिसरात चांगलीच खळबळ उडाली हाेती.
——————————–
उदईने पोखरलेले झाडे काढून नवीन झाडे लावा अशी होत आहे मागणी
रोडच्या मदात येत असलेले झाड हे १०० ते १५० वर्षा पूर्वीचे असल्याने बरेचसे झाड जमिनीपासून उदईने पोखरले असून झाड केव्हा कोणाच्या अंगावर येऊन कोसळतील काही नेम नाही रस्त्यावर येत असलेले झाड काढून पर्यावरण वाचवण्याकरिता रोडच्या बाजूला नवीन झाड लावून पर्यावरण वाचवा अशी मागणी आर्वीतील स्थानिक नागरिक करीत आहे.