१२ दुकाने फोडणारे अट्टल चोरटे अखेर कोण? गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच होणार पर्धा फाश
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दि. 09/02/2025 रोजी पहाटेच्या सुमारास नेहरू मार्केट आर्वी येथील 12 दुकानांमध्ये काही दरोडेखोरांनी दुकानांचे शटर तोडून दुकानाच्या गल्ल्यातील नगदी पैसे व इतर महाग वस्तू चोरून नेले. सीसीटीव्ही मध्ये जे दृश्य दिसत आहे त्याप्रमाणे, दरोडेखोरांच्या मनात कोणतीही भीती न बाळगता व ते मनसोक्तपणे आपले काम करत होते. शहराच्या इतिहासात अशा प्रकारची घटना कधीही घडली नसून त्यांच्या या कृत्यांमुळे सर्व आर्वीकर नागरिकांन मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे असं वाटत आहे की, शहरात गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांना पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक किंवा भीती उरली नाही. यावरून व्यापाऱ्यांमध्ये नव्हे तर संपूर्ण आर्वी शहरात प्रचंड दहशतीचे व नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे व स्वतःच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण कसे करावे याबद्दल चिंता वाटू लागली आहे व्यापारी संघटनेने आरोर्पीना लवकरात लवकर अटक करा व त्यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करा व व्यापाऱ्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल लवकरात लवकर जप्त करून परत देण्यात यावा. अशा प्रकारच्या घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये त्याकरिता नेहरू मार्केट व शहरात पोलिसांचे रात्रीची पेट्रोलिंग वाढवावे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाने दबाव निर्माण करावा.
अशी निवेदनद्वारे पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांना सुरक्षेची मागणी केली
सदर घटनेवर त्वरित व योग्य कारवाई व शहरातील जनता व व्यापाऱ्यांमध्ये जी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ती दूर करण्यात यावे जेणेकरून लोकांना सुरक्षितता वाटेल. अशी व्यापारी संघटनेने खासदार अमर काळे व आमदार सुमित वानखडे न्याया करिता दाद मागितली.