प्रतिनिधी संतोष वाघमारे
धामणगांव रेल्वे
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्हा द्वारा आयोजित पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला .लोकशाहीतील प्रसार माध्यम या एका महत्त्वाच्या चौथ्या स्तंभाचे वाहक म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आयोजित पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये धामणगाव रेल्वे येथील संतोष वाघमारे यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून माजी मंत्री वसंतराव पुरके, सांध्य दैनिक मतदार राज चे संपादक विजय गायकवाड संतोष डोंमाळे, पद्माकर घायवान, विलास कळसकर ,अरुण देशमुख यांनी सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मानित केले .
सांध्य दैनिक मतदार राज चे संपादक विजय गायकवाड यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मात्र अधिस्वीकृती धारक पत्रकार सोडले तर इतर पत्रकारांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत नाही .पत्रकार हा आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडतो ,सदैव इतरांसाठी धावतो ,मात्र पत्रकाराला काय मिळतो ?असा सवाल त्यांनी यावेळी केला .यावेळी अनेक ठिकाणावरून पत्रकार बंधू भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते. सांध्य दैनिक मतदार राजाचे प्रतिनिधी सिद्धार्थ बनसोड, महेश बुंदे यांना सुद्धा यावेळी सन्मानित करण्यात आले. पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या इतरही पत्रकारांना यावेळी सन्मानित करण्यात आले.