परमहंस संत योगी महादेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त दाभाडा ग्राम मध्ये भागवत सप्ताह व ग्रामगीता पारायण सप्तहा मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून सामुदायिक ध्यान व सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन केले असून ग्राममध्ये धार्मिक वातावरण निर्माण झालेले आहे. सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी आपल्या सामुदायिक प्रार्थना भाषणातून मधून सांगितले की आपल्या जीवनाची बोध शाळा आहे .
त्यामधून शिस्त, गांभीर्य ,उठन्या ,बसन्याचे ज्ञान आपल्या प्रार्थनेमधून मिळते आपले आई-वडिलांची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मातृदेवो भव वेदांनी आरंभीच केला गौरव असं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हणतात खरी संस्काराची जडणघडण आई-वडिलांपासून होत असते .आई-वडिलांनी चांगले संस्कार करणे हे प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य आहे .नाही तरी नवीन पिढी बिघडल्याशिवाय राहणार नाही. याला सर्वस्व कारणीभूत त्यांचे आई-वडीलच राहणार. यासाठी ज्याप्रमाणे जिजाबाईंनी शिवाजींवर लहानपणापासून रामायण महाभारत यासारख्या ग्रंथांच्या अभ्यास करून छोट्या छोट्या गोष्टी बाल शिवबाच्या मनावर घातल्या म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेऊन आपली भगवी पताका फडकविली असेच शिवछत्रपती सारखे भगतसिंग सारखे स्वामी विवेकानंद सारखे विद्यार्थी तयार व्हावे तरुण तयार व्हावे तेव्हाचे देशाचा नाव उज्वल होईल . माननीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेतून हे जीवन उच्चतम होण्यासाठी आपण नेहमी सत्य बोलावे, सत्य आचरण करावे हे सांगितलेले आहे आपल्याला जर आपले जीवन चांगले बनवायचे असेल तर सामुदायिक प्रार्थना ही आपल्या जीवनाची बौद्ध शाळा आहे म्हणून रोज आपल्या गावामध्ये आपल्या घरी सामुदायिक प्रार्थना करावी सामुदायिक प्रार्थमिक तून आपल्याला बळ मिळत असते नवीन विचार करण्याची शक्ती मिळते नवे नवे साक्षात ईश्वर आपल्याला यामधून बोध करत असतो आणि म्हणूनच प्रत्येक गावामध्ये सामुदायिक प्रार्थनेची आज आवश्यकता आहे आणि म्हणून आपण.
आज या सामूहिक प्रार्थनेतून आपल्या जीवनाची सुंदर अशी जडणघडण करूया हेच आजच्या युगामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे सोबतच ग्रामगीता ही या जीवनाची संजीवनी बुटी आहे तिचं अध्ययन करून जगण्याचा प्रयत्न केल्यास माणूस हा देव होतो .असे महत्त्वाचे प्रतिपादन सामूहिक प्रार्थनेच्या वक्तव्या मधून ग्रामगीताचार्यहनुमंत ठाकरे यांनी केली पुढे ते म्हणाले की या समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा, भोळेपणा ,हा बंद झाला पाहिजे त्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन त्यांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व समजून सांगितले आज संस्कार ही काळाची गरज आहे. त्यामुळे हा नवीन येणारा विद्यार्थी, तयार होईल आणि ग्राम आदर्श होईल ग्राम आदर्श झालं की राष्ट्र आदर्श होईल असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले . कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आरती व परमहंस ह महादेव बाबा यांची आरती करून जय घोष देण्यात आला प्रसादा प्रसादाचे वाटप करण्यात आले .कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक व बालगोपाल उपस्थित होते.