बाबासाहेबांनी पत्रकारिता करतांना मोफत शिक्षणाला महत्व दिले – सागर तायडे वाशिम येथे मुकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा उत्साहात ग्रामीण भागातील पत्रकारांचा भावपूर्ण सत्कार

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

वाशिम – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक जात, एक धर्म म्हणून कधीच कार्य केले नाही. त्यांचे कार्य सर्वसमावेशक होते. कामगार आणि मजूरांसाठी त्यांनी मराठवाड्याच्या दुर्गम भागात शिक्षण संस्था काढल्या. त्यांनी सुरु केलेले मुकनायक हे वृत्तपत्र प्रेरणादायी आणि लक्षवेधी होते. पत्रकारीता करत असतांना त्यांनी शिक्षणाला महत्व दिले. सर्वच घटकांना मोफत शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता असे प्रतिपादन कामगार नेते तथा जेष्ठ पत्रकार सागर तायडे यांनी केले.

स्थानिक पाटणी कमर्शियल मधील चिंतामणी हॉलमध्ये मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिनाचा सोहळा जिल्हाभरातुन आलेल्या पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष पत्रकार विनोद तायडे व स्वागताध्यक्ष अनिल ताजणे हे होते. तर मंचावर ह्दयरोगतज्ञ डॉ. सिद्धार्थ देवळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, कामगार नेते सागर तायडे मुंबई, स्त्रीरोग तज्ञ डॉ. तुषार गायकवाड, माजी जि.प. सदस्या सौ. कल्पना राऊत, नारी शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता इंगोले, म. रा. पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी, मेडशी ग्रा.पं. सरपंच शेख जमीर शेख गणिभाई, दलित मित्र गोपाळराव आटोटे, व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, साप्ताहिक माध्यम प्रतिनिधी संदीप पिंपळकर, संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभाताई सोनोने, समाजसेविका वैशाली खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून पिरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, अ‍ॅड. संजय इंगोले, कास्ट्राईब कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष हेमंत तायडे, सुधाकर पखाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आयोजन समितीच्या वतीने प्रमुख पाहूण्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील पत्रकार आणि समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पत्रकार फुलचंद भगत, विशाल राऊत, सिद्धांत जुमडे, अजय चोथमल, अनिल तायडे, चंद्रकांत गायकवाड, संदीप कांबळे, राहुल जुमडे, सागर अंभोरे, ज्ञानेश्वर वरघट, गौतम भगत, नागसेन पखाले, राजकुमार पडघान, अनंतकुमार जुमडे, माणिकराव सोनोने, अ‍ॅड. संजय इंगोले, प्रकाश चक्रनारायण, गोपाल सुर्वे, सुनिल फुलारी, अनिल कांबळे, महादेव हरणे, नागेश अवचार, प्रदीप सालवणकर, यशवंत हिवराळे, माणिकराव सोनोने, कैलास महाजन, महेंद्र महाजन, नंदकिशोर वैद्य, सुनिल मिसर, शिखरचंद बागरेचा, सुनिल भगत, सुधाकर चौधरी, रितेश देशमुख आदींचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट संचालनाबद्दल सौ. ज्योतीताई इंगळे यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रारंभी राजकुमार पडघान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आयोजन समितीचे मार्गदर्शक सुनिल कांबळे यांनी मुकनायक पत्रकार दिनाची स्थापना आणि ४ वर्षाची वाटचाल विषद केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांची विचारधारा जोपासून नेटाने पत्रकारीता करणार्या ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार करुन त्यांचे मनोबल उंचाविण्याचे समितीचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजही अनेकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मंजूर नाही – गोपाळराव आटोटे

प्रमुख मार्गदर्शन करतांना जेष्ठ आंबेडकरी नेते गोपाळराव आटोटे गुरुजी यांनी सांगीतले की, आज आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. मात्र अजुनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मंजूर नाही. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्यात आजही बाबासाहेबांच्या पुतळ्याची व संविधानाची विटंबना केल्या जात आहे. या बाबीवर पत्रकारांनी जागुत राहीले पाहीजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या पत्रकारीतेचा पैलू नव्या पिढीसमोर मांडला जात आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. बाबासाहेबांच्या पत्रकारीतेचे अनेक पैलू गंगाधर पानतावणे यांनी समोर आणले. बाबासाहेबांचे कार्य हे सर्वच घटकांसााठी उपकारक असून त्याचा सर्वांनी स्विकार केला पाहीजे असे ते शेवटी म्हणाले. तद्वतच आटोटे यांनी आप्पासाहेब जुमडे व गणेश पडघन यांना श्रद्धांजली वाहतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारीतेची आजच्या काळात गरज असल्याचे अधोरेखित केले.

पत्रकारांनी आपल्या लेखणीतून वाईटांवर आसूड ओढावे – माधवराव अंभोरे

जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे म्हणाले की, बाबासाहेबांनी पत्रकारांना लिहीण्याचे स्वातंत्र्य दिले. याची जाणीव ठेवून पत्रकारांना आपल्या लेखणीतून वाईटावर आसूड ओढण्याचे काम केले पाहीजे. ग्रामीण भागातील लहान पत्रकारांना आजही अनेक त्रास व अडचणीचा सामना करावा लागतो. चांगली बातमी लिहीली तर कोणीही कौतूक करत नाही. मात्र विरोधात बातमी लिहीली तर त्याला त्रास दिल्या जातो. ग्रामीण भागातील या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या लेखणीला बळ दिले पाहीजे.

महामानवाच्या विचारांची आजही देशाला खरी गरज – निलेश सोमाणी

  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमाणी म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवला. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वची शिकवण देणार्‍या महामानवाच्या विचाराची आजही देशाला खरी गरज आहे. पत्रकाराने अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी झटावे असे आवाहन त्यांनी केले.

आजची पत्रकारीता ठराविक व्यवस्थेला वाहिलेली आहे – विनोद तायडे

 

आपल्या भाषणातून कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद तायडे यांनी आज मुकनायकाची गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, आजची पत्रकारीता काही ठराविक व्यवस्थेला वाहीलेली आहे. प्रथम हा कार्यक्रम करत असतांना अनेकांनी आमच्यावर टिका केली. मात्र या टिकेला घाबरुन आम्ही थांबलो नाही. पत्रकारीता हे बाबासाहेबांनी दिलेले हत्यार असून पत्रकार आपल्या लेखणीतून क्रांती घडवू शकते.

मुकनायक हे वृत्तपत्र शोषित समाजाला बोलके करणारे – सागर तायडे

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना जेष्ठ कामगार नेते सागर तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर, कामगार, शेतकरी आदी घटकासाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, बाबासाहेबांनी कामगारांसाठी सुरु केलेले मुकनायक हे वृत्तपत्र शोषित समाजाला बोलके करणारे होते. या वृत्तपत्रातून त्यांनी विविध घटकाच्या समस्या प्राधान्याने मांडल्या. बॅरीस्टर झाल्यानंतर त्यांनी प्रथमच सफाई कामगारांसाठी युनियनची स्थापना केली. स्वतंत्र मजदुर युनियन काढली. मात्र बाबासाहेबांकडून आपण काय शिकलो? याचा विचार केला पाहीजे. इमारत बांधकाम कामगार, गोदी कामगार, विटभट्टी कामगारांच्या समस्येवर त्यांनी प्रबंध सादर करुन पार्लमेंटमध्ये सादर केले. जेष्ठ पत्रकार माधव गडकरी यांनी लोकसत्ता मधील मार्मिक या सदरात लेख लिहील्यानंतर नामांतराची चळवळ सुरु झाली. इतकी ताकद पत्रकारीतेत आहे.  आजही ९३ टक्के कामगारांची शासनदरबारी नोंदच नाही. कामगारांसाठी आलेला निधी आचारसंहितेच्या नावाखाली रोखून धरण्यात आला आहे. बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत कामगारांच्या समस्या मांडल्या. घरकामगार, नाका कामगार, शेतमजूर, गिरणी कामगारांसाठी त्यांनी मोठा लढा दिला. सर्वाना मोफत शिक्षण मिळावे हा बाबासाहेबांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी मराठवाडयातील दुर्गम भागात शिक्षण संस्था काढल्या. एक जात एका धर्मासाठी त्यांनी कधीही कार्य केले नाही. त्यांचे कार्य सर्वसमावेशक होते. पत्रकार ही मोठी शक्ती आहे. पत्रकार अधिकार्यांना प्रश्न विचारु शकतो. मात्र समाजाला जागृत करायचे असेल तर पत्रकारीतेच्या माध्यमातून प्रबोधन केल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. त्यांनी काढलेले मुकनायक हे वृत्तपत्र प्रेेरणादायी व लक्षवेधी होते असे ते शेवटी म्हणाले. उपस्थितांचे आभार पप्पु घुगे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाभरातून विविध वृत्तपत्रांचे, वृत्तवाहिन्यांचे व सोशल माध्यमांचे पत्रकार बहूसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वागताध्यक्ष अनिल ताजने, आयोजन समिती मार्गदर्शक बबनराव खिल्लारे, सुनिल कांबळे, सुधाकर पखाले, राजाभाऊ इंगोले, आयोजन समिती अध्यक्ष विनोद तायडे, उपाध्यक्ष संतोष वानखडे, माणिकराव डेरे, रवी अंभोरे, विनोद डेरे, बंडू इंगोले, किरण पखाले, कार्याध्यक्ष पप्पू घुगे, सचिव राजकुमार पडघान, कोषाध्यक्ष संदीप डोंगरे, प्रसिद्धीप्रमुख ज्योती इंगळे, सदस्य अजय ढवळे, संजय खडसे, भारत कांबळे, नाना देवळे, श्रीकृष्ण खिल्लारे, संतोष कांबळे, नागेश अवचार, पूजा बनसोड, किरण पडघाण आदींनी अथक परिश्रम घेतले. शेवटी सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

veer nayak

Google Ad