लहानपणी वडील वारले ती बनली गावातील पहिली डॉक्टर..!

0
58
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती प्रतिनिधी;

लहान असतांनाच वडील वारले शिक्षण घेऊन बी.ए.एम.एस उत्तीर्ण करण्याची उत्कृष्ट कामगिरी करत बोरगांव धांदे गावातील सृष्टी प्रविण धांदे हिने पहिली डॉक्टर बनण्याचा मान मिळवला आहे.

 ध्येय पक्क असेल आणि आपल्या मेहनतीवर विश्वास असेल तर प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्ने पूर्ण करतो. अनेक संकटे मागे टाकून ती यशाच्या मार्गावर पुढे जात राहते. 

सृष्टी लहान असतांनाच वडील ऍड.प्रविण धांदे यांचे निधन झाले.त्यानंतर सृष्टीची संपुर्ण जबाबदारी ही तिची आई पुजा प्रविण धांदे यांच्यावर आली आईच्या संस्काराने आणि वडील नसल्याची जबाबदारी पेलत सगळया प्रश्नातून उत्तर शोधत सृष्टीने आपल्या मेहनतीच्या आणि झोकून देऊन प्रयत्न करण्याच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

सृष्टीने सातव्या वर्गापर्यंत पाच किलोमीटरचा बोरगांव धांदे ते पुलगाव प्राथमिक शिक्षणाचा प्रवास हा साईकलने गाठला असुन एका मुलीसाठी हा पाच किलोमीटर रोज ये-जा करने तेव्हा, जेव्हा वडिलांचे डोक्यावर छत्र नसणे, पुढील शिक्षणासाठी पुलगाव येथे वास्तव्यास गेल्या नंतर दहावी पर्यंतचे शिक्षण हे सेंट जॉन स्कूल पुलगाव येथे झाले असून अकरावी बारावी व नीट ची तयारी ही अकोला येथे केली. नंतर भाऊसाहेब मूलक आयुर्वेदिक कॉलेज नागपुर बि.ए.एम.एस ची परीक्षा उत्तीर्ण करून PHC प्राथमिक उपचार केंद्र गौळ, ता.देवळी, जिल्हा वर्धा येथे M.O मेडीकल ऑफिसर आयुर्वेदिक डॉक्टर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल २ फेब्रुवारी रोजी तिच्या मूळ गावी भव्य सत्कार होणार आहे.

 गावाचा अभिमान – भव्य सत्कार समारंभ!

बोरगाव धांदे गावात दुर्गा माता मंदिर सभागृहात तिचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर सृष्टी आणि तिच्या कुटुंबाचा प्राध्यापक डॉ. अमित धांदे, शिक्षक रविंद्र नाचणे, विजय सगने, अंकुश उईके, मिलींद सवाळे, क्रीडाशिक्षक रंजित धोटे, सरपंचा श्रुती उईके, आर्मी कमांडर अमित मुडे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.

 गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन!

कार्यक्रमाचे आयोजक विक्रम उईके, देवानंद मेश्राम, प्रवीण सवाळे यांनी गावातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

veer nayak

Google Ad