आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दि.२७:- बँक ऑफ इंडियाने जप्त केलेली मालमत्ता राकेश लक्ष्मीचंद खत्री यांनी रीतसर बँकेकडून विकत घेवुन सुद्धा अडथळा निर्माण प्रकरणाला वेगळं वळण देण्याच्या उद्देशाने अजय कदम यांनी केलेल्या खोट्या तक्रारारीवरुन पोलीसांनी ॲड. दिपक मोटवाणी यांच्या विरूध्द खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप असुन व्यापारी सुध्दा त्यांच्या मदतीकरीता मैदानात उतरले आहे. व्यापाऱ्यावर खोट्या तक्रारीवरून संगीन गुन्हे दाखल होत असेल तर व्यापारी संघटना आंदोलन करणार अशे व्यापारी संघटनेनी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांना दिले निवेदन अजय कदम यांचे बस स्थानका लगतच्या वसंत नगर मध्ये प्लाट क्रमांक ४ वर बांधलेले घर आहे. त्यांनी बँक ऑफ इंडियाला प्लॅटसह घर गहान करून व्यवसायाकरीता कर्ज उचलले होते. त्या कर्जाची परत फेड न झाल्यामुळे बँकेने त्या घराचा रीतसर लिलाव करुन रॉकेश लक्ष्मीचंद खत्री याला एक कोटी ५६ लाखात विकुन त्याची गुरूवारी (ता.२३) विक्री करुन दिली व जागेचा ताबा सुध्दा दिला.
शनिवारी (ता.२५) ला ॲड. दिपक मोटवाणी हा २-३ लोकांना सोबत घेवुन लगतच्या अजय कदम यांच्या मालकीच्या पाच नंबरच्या प्लॉट मधील घरात शिरला येथे मत्सव्यवयास सुरू असुन अजय कदम यांची पत्नी व सुन होती तिला धक्काबुक्की करुन अश्लील शब्दात शिवीगाळ केली. तसेच राम निस्ताने, बाजी निस्ताने, मत्सपालन अजय कदम व त्याच्या मुलाला सुध्दा मारहान केली. तसेच दहा हजार रुपये व मुलाच्या बोटातील सोन्याची अंगठी हिसकावुन घेतल्याची अजय कदम, कुणाल कदम, बाजी निस्ताने, राम निसताने व महिलांनी केलेल्या तक्रारीत असे नमुद केले आहे.
प्राप्त तक्रारीवरुन पोलीसांनी ॲड. दिपक मोटवाणी यांच्या विरोध्दात भारतीय न्याय संहिता (बी.एनएस) २०२३ कलम ३०९ (६), २९६ व ३३३ अन्वये गुन्ह्याची नोंद घेवुन तपास सुरू केला आहे.
पोलीस महानिरीक्षक खुद तपासा करीता ९ तास हजर हाेते.
हे प्रकरण छोटस जरी असल तरी, यात नागपुरचे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी लक्ष घातले असुन त्यांनी घटना स्थळाला भेट दिली आहे. तर, मालमत्तेच्या दस्ताऐवजाची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय फिर्यादी व आरोपीची सुध्दा विचार पुस करुन माहिती घेत आहे. तर, वर्धा जिल्हा अधिक्षक अनुराग जैन व सहाय्यक अधिक्षक सागर कडवे हे सुध्दा सकाळी दहा वाजता पासुन ठाण मांडून बसले असुन सखोल तपास करीत आहे मात्र वृत्त लिही पर्यंत कोणताही निर्णया पर्यंत पोहचल्याचे दिसले नाही.
राजकीय नेत्याचा हस्तक्षेप
या प्रकरणात खासदार व सताधारी आमदार यांचा प्रत्यक्षपणे हस्तक्षेप होत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव निर्माण झाला असल्याने पोलीस महानिरीक्षक, वर्धा पोलीस अधिक्षक, सहाय्यक अधिक्षक यांनी प्रकारणात लक्ष घातल्याची जोरदार शहरात चर्चा आहे.
बाजार बंद ठेवण्याची व्यापाऱ्यांचा निर्णय
ॲड. दिपक मोटवाणी हे व्यापारी संघटनेचे विधी सल्लागार असुन त्यांच्या बचावा करीता व्यापारी संघटना सुध्दा उतरली आहे. त्यांनी पोलीस अधिक्षक जैन यांना निवेदन देवुन ॲड. दिपक मोटवाणी, करण मोटवाणी आदिंवर पोलीसांनी दबावा पोटी खोटा गुन्हा दाखल केल्याचे नमुद करुन उलट ॲड. दिपक मोटवाणी व इतरांवरच हल्ला झाला असुन त्यांची तक्रार पोलीसांना घ्यावी तसेच ॲड. दिपक मोटवाणी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा पोलीसांनी मागे घ्यावा अन्यथा बाजार पेठ बद करुन आंदोलन करण्यात येईल अशी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे.