आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक विकास होण्याच्या दृष्टीने योग खेळ व संगीत या उपक्रमा अंतर्गत सर्वांगीण बाबींचे प्रशिक्षण मिळावे तसेच सध्याच्या असुरक्षिततेच्या काळात आत्मसंरक्षण व स्वसंरक्षणासाठी विद्यार्थी स्वयंपूर्ण व्हावा, संरक्षण विषयक कौशल्य विकासित व्हावे तसेच भविष्यातील खेळांच्या विविध स्पर्धेत सहभागी होण्या च्या उद्देशाने किक बॉक्सिंग , कराटे व आत्मसंरक्षणाचे धडे या सर्व बाबींचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून मार्शल आर्ट व इतर खेळामध्ये पारंगत असलेले प्रशिक्षक सन्माननीय सलीम शेख सर यांची निवड शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार करण्यात आली . सदर वर्गाला
सलीम शेख सर व त्यांची टीम विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करीत आहे . भविष्यात खेळांच्या विविध स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांमधून एक उत्तम खेळाडू निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम शालेय स्तरावर पीएमश्री शिवाजी प्राथमिक शाळा नगरपरिषदआर्वी येथे राबविण्यात येत आहे. मुख्याध्यापिका पदमा चौधरी यांच्या संकल्पनेतून व सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून सदर प्रशिक्षणाचा वर्ग शाळेत सुरू आहे.