स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि एस. ओ.एस. कब्स येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

0
95
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे, १५ ऑगस्ट २०२४

मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्थे द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि एस.ओ. एस. कब्स धामणगाव रेल्वे येथे भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा केला.

शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी, एस.ओ.एस. कब्स येथील मुख्य व्यवस्थापक श्रीमती शबाना शेख आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मेजर सुभेदार रामदासजी हाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण झाले. यानंतर, सरस्वती व भारत मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले समारंभाच्या दुसऱ्या भागात भारतीय सैन्यात ३० वर्षे सेवा बजावलेले सुभेदार रामदासजी हाडे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मागील सत्रातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा केशव दिलीप मुंदडा, दीप्ती दिवाकर राऊत, आणि अंकुर नितीन वाईचोल त्याचप्रमाणे विविध विषयानुसार गुणवत्ताप्राप्त वि‌द्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांकडून पदक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्काराने उत्साह अधिक वाढवला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे यांनी आपल्या भाषणातून वि‌द्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाब‌द्दल मोलाचे मार्गदर्शन केले शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वि‌द्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समजावले. संगीत शिक्षक गौरव देवघरे यांच्या चमूने मंत्रमुग्ध करणारे तबला वादन आणि नृत्य शिक्षक सचिन उइके यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ६ वीच्या वि‌द्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले. तसेच, वर्ग चौथीच्या वि‌द्यार्थिनी कु. अक्षिता राठोड, पाचवीच्या स्वरांजली गावंडे आणि नयन इंगोले यांच्या भाषणांनी आणि विविध क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी रुद्र निकम, रुकैया बोहरा, क्रिष्णा चौधरी, प्राप्ती सहारे, चैताली बोधडे, श्रृष्टि राठोड, केतकी जगताप, स्वस्तिका पोळ, अनुश्री चावरे, अर्णव बढिये, हितार्थ चिंचे, मंथन चावरे, रुद्र निकम, राजवीर शिरभाते, सम्यक व्ही. कांबळे, सम्यक एस. कांबळे आणि मंथन राठोड यांना सत्काराने गौरवान्वित करण्यात आले.

प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कठोर परिश्रमाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

veer nayak

Google Ad