आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : दिनांक 26 जानेवारी 2025 76व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पोलीस स्टेशन आर्वीला भेट देण्यात आली. आजच्या दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली व आपली न्यायपालिका आजच्या दिवसा पासून सुरवात झाली.भारतातल्या प्रत्येक नागरिकांना समानतेचा अधिकार, मतदानाचा अधिकार, संविधानामुळे मिळू लागले. म्हणून 26 जानेवारी ला मोठया उत्सवात भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या निमित्याने पोलीस स्टेशन आर्वी येथे फोटो फ्रेम स्वीकारताना मा. स.पो.नि.प्रल्हाद मदन साहेब यांनी आपण आज जे आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आहे.त्यांचे उपकार फेडू शकत नाही.असे वक्तव केले.या वेळेस उपस्थित गौतम अशोकराव कुंभारे, अध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य, गजू चावरे, सुनील खोरगडे,राजू डोंगरे, मैबूब शेख,विनोद सरोदे, मंगेश सरोदे,वानखडे काका, मनोज गोंडणे. व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते