तळेगाव दशासर :-
स्थानिक कृषक सुधार मंडळ द्वारा संचालित माध्यमिक कन्या विद्यालय,तळेगाव दशासर येथे 26 जानेवारी 2025 ला स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.ध्वजारोहण मुख्याध्यापिका मंजुषा देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सौ रेखाताई धोंडगे उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी सौ शुभांगी देशमुख,सौ मीना ठाकरे ,श्रीमती माया चाटसे,सौ अनिता मेश्राम, सौ नीता गवळी,श्री शिवाजीराव देशमुख ,श्री विनोदराव रामेकर,श्री मोहनराव देशमुख,श्री भूपेंद्र नाईकनिंबाळकर,श्री आनंद देशमुख,श्री पंकज देशमुख,श्री विनोद देशमुख,श्री अशोकराव गायकवाड होते.पत्रकार बांधव ,पालक पालिका ग्रामपंचायत सदस्य , प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सहा पोलीस महामार्ग पुलिस केंद्र प्रभारी माया चाटसे देवगाव यांनी उपस्थिताना वाहतूक नियमावली समजावून सांगितली व शपथ दिली. जागर स्त्री शक्तीचा उपक्रमांतर्गत विदर्भ केसरी मैदान गाजविणाऱ्या महिला धुरकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात स्वागतगीत,कवायत, लावणी,पोवाडा, आदिवासी नृत्य ,भांगडा,धनगरी नृत्य,ऐतिहासिक नाटिका आदी कलाकृती सादर करण्यात आल्या. ध्वजारोहण संचालन कू मरसकोल्हे मॅडम यांनी ,सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचलन कू पांडे व सौ थोरात यांनी केले.मुख्याध्यापिका सौ देशमुख यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी पोमेश थोरात ,सागर अवचट ,कू नयन कावळे, कू दंडारे, कू गवळी,अभिजीत कावळे ,लक्ष्मण पोटे ,गजानन कावळे आदींचे सहकार्य लाभले.