संस्था संस्थापक स्व. श्री. श्रीनारायणजी अग्रवाल यांचा 54 वा “स्मृतिदिन – कृतज्ञता दिन”…  व से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांचा वार्षिक “स्नेहसंमेलन ” उद्घाटन सोहळा संपन्न.. धामणगाव रेल्वे- तालुका प्रतिनिधी

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दिनांक -1 डिसेंबर स्व. श्री. श्री.नारायणजी अग्रवाल यांचा स्मृतिदिन – कृतज्ञता दिन निमित्त त्यांच्या प्रतिमेस धा. ए. सो. चे अध्यक्ष ऍड.श्री.रमेशचंद्रजी चांडक यांच्या हस्ते पूजन करून नंतर संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. व तसेच विद्यालयाचा ध्वज मागील वर्षी से. फ. ला.विद्यालयातून प्रथम आलेली विद्यार्थ्यांनी कु.लावण्या बकाले हिच्या हस्ते फडकवण्यात आला व एन.सी.सी. कॅडेट्स व बुलबुल पथक यांच्याद्वारे मानवंदना देण्यात आली. उपस्थित सर्व अतिथी यांच्या हस्ते विविध कला दलनामध्ये रांगोळी प्रदर्शन, पुष्परचना प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन,विज्ञान प्रदर्शन या सर्व दालनांचे उद्घाटन करण्यात आले..

कार्यक्रम प्रसंगी सरस्वतीस्तवन व स्वागत गीत विद्यालयाचे शिक्षक नारायण सुरंदसे त्यांच्या चमुनीं सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व अतिथींचा परिचय मा. ऍड. श्री. आशिषजी राठी, सचिव धा.ए.सो. यांनी करून दिला..

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व स्नेहसंमेलनाचे उद्घाटक मा.ऍड. श्री मोतीसिंहजी मोहता. अध्यक्ष दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला. तथा माजी अध्यक्ष बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा राज्य.यांचा सत्कार ऍड. श्री.रमेशचंद्रजी चांडक यांच्या हस्ते करण्यात आला.. आदर्श महाविद्यालयाचे माजी प्राचार्य योगेंद्र गांडोळे व तसेच श्रीमती हरीभाई भागचंदजी प्राथमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ चंदा चौधरी यांचा ऍड. श्री.रमेशचंद्रजी चांडक यांच्या हस्ते करण्यात आला.. तसेच “प्रतिभांकुर ” विद्यालयाच्या वार्षिककांकाचे विमोचन कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ऍड. श्री मोतीसिंहजी मोहता यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयाचा अहवाल वाचन समीर अली विद्यालयाचा नवनिर्वाचित संमेलन कार्यवाह याने केले.. या कार्यक्रमाप्रसंगी दहावी व बारावीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला..

प्रमुख अतिथींच्या भाषणात निसर्गाने आपल्याला विविध स्वरूपात रेखाटले असून, प्रत्येक व्यक्तिमध्ये एक विशेष गुण असते आणि ते विद्यार्थी दशेत ओळखून त्याचा उपयोग करून भविष्यात विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याच्या प्रेरणेने कार्य केल्यास आपण प्रगतशील होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमीत कमी करावा, वडीलधाऱ्या व्यक्तींशी आदराने वागावे. आपल्या कर्तव्याचे पालन करा, सतत ज्ञान मिळवत रहा.. आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते अधिक वाढते..असे प्रतिपादन मा.ऍड. श्री मोतीसिंहजी मोहता यांनी से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय अभिभाषण मध्ये विद्यार्थ्यांनो भरपूर शिका.. खूप मोठे व्हा.. असा मौलिक सल्ला एड.श्री.रमेशचंद्रजी चांडक यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांना दिला..

धामणगाव परिसरात शैक्षणिक क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणारे, धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे संस्था – संस्थापक, शिक्षणमहर्षी स्व.श्री. श्रीनारायणजी अग्रवाल यांच्या 54 वा स्मृतिदिननिमित्त १ डिसेंबर रोजी “कृतज्ञता दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने से.फ.ला.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संमेलनाचे उद्घाटक म्हणून मा.ऍड. श्री मोतीसिंहजी मोहता हे लाभले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड.श्री रमेशचंद्रजी चांडक हे होते. विशेष उपस्थिती मा.श्री पुरुषोत्तमजी राजगुरू माजी आमदार वाशिम विधानसभा क्षेत्र. प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव ऍड. श्री आशिषजी राठी, सहसचिव डॉ. श्री.असितजी पसारी, कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती म्हणून ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य मा. श्री. अशोकजी सकलेचा,मा. श्री.चंद्रशेखरजी पसारी, मा.डॉ. प्रकाशचंद्रजी राठी ,सत्कार मूर्ती आदर्श महाविद्यालयाचे माजी प्राचार्य योगेंद्र गांडोळे, श्रीमती हरिबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ.चंदा चौधरी व से.फ. ला. विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे हे व्यासपीठावर उपस्थित होते..

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. डॉ.श्री.असितजी पसारी,सहसचिव धा. ए.सो. यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे शिक्षक कैलाश चौधर यांनी केले. या सर्व कार्यक्रम सोहळ्याला धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा, महाविद्यालय, बालक मंदिर यांचे सर्व प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सोबतच सर्व विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते..

दिनांक – 2 डिसेंबर 2024

सोमवार

veer nayak

Google Ad