धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे व नंदुरबार जिल्हा कलाध्यापक संघ आयोजित 43 वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद 2025 चे आयोजन शहादा जिल्हा – नंदुरबार येथे दिनांक – 11 व 12 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले होते..
या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेत संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून कित्येक कला शिक्षक व विविध मान्यवर उपस्थित होते.. या कलाशिक्षण परिषदेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रांगोळी कलावंत व फलक लेखन या कला प्रकाराचे कलावंत सोबतच काही कलावंताचे वॉटर कलर, ऍक्रेलिक कलर, चारकोल माध्यमातून विविध चित्र विषयांचे प्रत्यक्ष देण्यासाठी आमंत्रित होते..
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कला शिक्षक – चित्रकार अजय जिरापुरे यांची एकमेव संपूर्ण विदर्भातून फलक लेखनाचे प्रात्यक्षिक देण्यासाठी कलाशिक्षण परिषदेमार्फत निवड करण्यात आली.. या फलक लेखन विषयांमध्ये विविध फलक लेखन रेखाटन करणाऱ्या कलावंतांनी विविध विषय आपल्या आवडीप्रमाणे निवडले होते. या फलक रेखाटन प्रात्यक्षिकामध्ये कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी ” जाणता राजा ” श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे खडूंच्या माध्यमातून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रेषाचे स्ट्रोक या माध्यमातून व्यक्तिचित्र रेखाटन करून आपल्या चित्र शैलीची बघणाऱ्यांना भुरळ पाडली.. उपस्थित कलाशिक्षक,विविध मान्यवर, शहादा शहरातील विविध विद्यार्थी नागरिक यांनी कलाशिक्षक अजय जिरापुरे यांच्या फलक चित्रशैलीचे कौतुक अभिनंदन केले..
कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी दिलेल्या फलक लेखन या कला प्रकाराचे प्रात्यक्षिक देऊन महाराष्ट्रातील उपस्थित कला शिक्षकांना या नावीन्यपूर्ण माध्यमाविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल कलाशिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष राजेंद्र बराई, राज्यसचिव डिगंबर बेंडाळे, जिल्हाध्यक्ष नंदुरबार जिल्हा प्रमोद मोघे तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला..
धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रदीप मानकर, पर्यवेक्षक आनिल लाहोटी तसे विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कलाशिक्षक अजय जिरापुरे यांचे त्यांच्या या कार्याबद्दल कौतुक अभिनंदन केले आहे…
दिनांक – 14 जानेवारी 2025 – मंगळवार