३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा. होणार सलग सहा दिवस साजरा. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने. विविध स्पर्धेचे आयोजन 

0
47
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ६ जून २०२४ रोजी ३५० वर्ष पूर्ण होत असून..

महाराष्ट्र सह संपूर्ण देशात त्रिशतक उत्सव साजरा केला जाणार आहे शिवराज्याभिषेक चे औचित्य साधून अमरावती मध्ये

राज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने एक जून ते सहा जून सलग सहा दिवस विविध स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये १ जून रोजी सकाळी ६ वाजता राम नगर येथे प्रशांत नगरच्या गार्डन जवळ शिव पहाट व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने राज्याभिषेक कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे

२ जून रोजी घरोघरी राज्याभिषेक 

देखावा स्पर्धा,४ जून घरोघरी रांगोळी स्पर्धा, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिव टेकडी येथे वृक्षारोपण,

सहा जून शिवराज्याभिषेक दिनी सकाळी आठ वाजता शिव टेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळाला अभिवादन कार्यक्रम

शिवराज्याभिषेकाचा मुख्य कार्यक्रम गुरुवार दिनांक ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे

सुप्रसिद्ध व्याख्याते व अभ्यासक

प्रा. गंगाधर बनबरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य व आजची राजसत्ता या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.. 

या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे उद्घाटक म्हणून अमरावती मनपाचे आयुक्त देविदास पवार, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आडे, तर प्रमुख उपस्थितीमध्ये

डॉ.भीमराव वाघमारे, निरंजन गाठेकर, चंद्रकांत मेहत्रे, प्रीतीताई देशमुख, शिवाजीराव बचाटे, असलम हमीद खान, प्रमोद कापडे, डॉ.बबन बेलसरे,प्रा.अनुप शिरभाते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर कडू, अश्विन चौधरी, निलेश ठाकरे, मनीष पाटील, दिनेश ठाकरे, हर्षाताई ढोक, लिनता पवार, प्रतिभा रोडे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.. सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण ही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सर्व शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आयोजकांच्या च्या वतीने आवाहन करण्यात आले अधिक माहितीसाठी खालील मो.नबर वर 7083699489, 8329704206 संपर्क साधावा

veer nayak

Google Ad