आर्वी, प्रतिनिधी / पंकज गोडबोले
आर्वी : फेब्रुवारी महिन्यातच राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने ऐन थंडीत उन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणारी पानगळ यंदा जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात झाल्याने यंदाचा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा राहील असे संकेत जानेवारी महिन्यात झालेल्या पानगळी सुरू झाले
नागपूर-बंद्रपूर 46 ते 47 डिग्री पर्यंत तापमान जाण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेले आहे. तर दुसरीकडे यंदा उन्हाळ्यात मार्च महिन्याच्या शेवट व एप्रिल व मे मध्ये उष्णतेच्या लाटा निर्माण होणार आहे. सध्या फेब्रुवारी महिन्याला जेमतेम सुरवात झाली असून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. सध्या काही ठिकाणी कमाल तापमान ३६ अंशांच्या पार पोचले आहे. उन्हाचा चटका आणि उकाड्यामुळे घाम निघत आहे. रविवारी २ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सोलापूर आणि वाशीम येथे ३६.४. अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच झालेल्या तापमानाच्या नोंदीमुळे विदर्भात यंदाचा उन्हाळ्यात उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाचे वर्ष सलग तिसरे उष्ण वर्ष होण्याची शक्यता आहे. यंदा फेब्रुवारी महिन्या पर्यंत निनो चा प्रभाव राहणार असून यावर्षी मार्च ते मे हे महिने येनसो रथ प्रभाव हीन असेल. गेल्या २०२४ मध्ये ज्या प्रमाणे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले त्याच प्रमाणे २०२५ सुध्दा उष्ण वर्षे ठरेल आणि उन्हाळ्यात तापमान वाढेल. मार्च च्या सुरवातीला तापमान वाढणे सुरू होणार आहे तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून ऊष्ण लहरी येणार असून एप्रिल व मे महिन्यात ३ उष्ण लहरींचा अंदाज आहे.
२०२५ उष्णतेचे सलग तिसरे वर्ष ठरण्याचा अंदाज
यंदा ऊष्णतेमुळे विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे तापमान वाढ होईल. चंद्रपूर, नागपूर येथे तापमान ४६ ते ४७ डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी होउन पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलग तिसरे वर्ष उष्णतेचे राहील अशी शक्यता प्राः सुरेश चोपणे हवामान अभ्यासक यांनी व्यक्त केली आहे.
—————————————–
उष्णतेचा शेतकऱ्यांवर परिणाम पाण्याची पातळी कमी झाल्याने मोठी कसरत
प्रतिक्रिया
फेब्रुवारी महिना हा मध्यम थंडीचा असतो परंतु फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णता वाढली आहे सलग दोन वर्षांपासून उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे जिथे पाणी कमी आहे तिथे शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते इरिगेशन जरी असले तरी पातळी जर कमी झाली शेतकऱ्यांना इलाज नसते शेवटी शेतकरी हा निसर्गावरच अवलंबून राहतो निसर्गाने साथ दिली तरच काहीतरी हाती लागतं.
सुधीर ज्याचक (शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता)
————————————-
प्रतिक्रिया
दोन-तीन वर्षापासून तापमानाचे प्रमाण वाढल्याने मागच्या वर्षी सारखेच यावर्षी सुद्धा फेब्रुवारी महिन्यापासून महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाची सुरुवात झाली असून दुसरे पीक घेणे हे फार कठीण झाले आहे. दिवसा ओलीत होत नसल्याने पर्याय नसल्यामुळे रात्रीच ओलीत कराव लागते. मोठी कसरत करून काही पिकलं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही तर निसर्गही साथ देत नाही..!
अमित भुसारी (शेतकरी)
————————————-
प्रतिक्रिया
फेब्रुवारी महिन्यातच तापमानाला सुरुवात झाल्याने काही भागात दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. उन्हाळ्यात पाण्याचा वापर कमी केला पाहिजे पाणी जितकं वाचवता येईल तितकं पाणी वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे कुठे व्यर्थ पाण्याचे नळ सुरू दिसत असेल किंवा पाईपलाईन फुटलेली दिसत असेल तर सामाजिक बांधिलकी जोपासून जल प्राधिकरणाला माहिती देऊ बंद करावे व पाणी वाचवुन योगदान करावे. “जल है तो कल है”..!
रवी गोडबोले (सामाजिक कार्यकर्ता)
—————————————-