पुरुषांच्या तुलनेत नेहमीच महिलांचे कष्ट जास्त राहिले.पण तिच्या कर्तृत्वाची दखल आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने कधी घेतली नाही.कालौघात काहींनी बंधन झुगारून उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलं. स्वतःशी आणि समाजाशी संघर्ष करत आपलं असं आभाळ बनवलं की तिची आकाशभरारी क्षितिजापार गेली तरीही आई, बहिण, पत्नी, मुलगी ही निसर्गनिर्मित पाऊलवाट मात्र कायम राहिली.या निसर्गदत्त देण्यालाही पुरेपूर खरं उतरून आपली ओळख कायम राहावी यासाठी तिचे हे कष्ट आजही अव्याहत सुरूच आहेत..
से.फ.ला.हायस्कूल,धामणगाव रेल्वे जिल्हा – अमरावतीचे कलाशिक्षक – चित्रकार अजय जिरापुरे यांनी दिनांक-8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यलक्ष्मी बुंदेलखंड सम्राज्ञी अखंड सौभाग्यवती श्रीमंत राजमाता झांशी विरांगना महाराज्ञी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर यांचे फलक रेखाटन करून महिलांच्या अपूर्व त्यागाला त्रिवार वंदन केले आहे व सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत..
















