चांदुर रेल्वे ता. प्र. प्रकाश रंगारी
अमरावती- बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात, युवा स्वाभिमानी पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त.12 जानेवारी
ला कार्यकर्ता पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन केल्या गेले आहे. 12 जानेवारीला सांस्कृतिक भवन येथे सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमा मद्ये अपंगांना साहित्य वाटप करण्यात येईल. तसेच बेरोजगार सलून व्यवसाय करणाऱ्यांना सलून व्यवसाय किटचे
वाटप करण्यात येईल. पी आर कार्ड चे वाटप सुद्धा करण्यात येईल या कार्यक्रमात जास्तीत जास्त गरजू लोकांनी लाभ घेण्याचे आव्हान केल्या गेले आहे. या सोबतच 14 जानेवारीला सकाळी दहा वाजता हनुमान गडीवर पतंगोत्सव होईल.
या प्रकारची माहिती बडनेरा मतदार संघाचे आमदार व युवा स्वाभिमानी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांनी दिली आहे.