दिनांक 8 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना “गाव तिथे शाखा” या उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे येथे मार्गदर्शन पर सभा घेण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राहुल भैया दुबाले, राज्य सचिव योगेश भैया कदम, विदर्भ अध्यक्ष आशुतोष दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.
कार्यक्रमात विदर्भ सचिव आदरणीय खुशाली ताई चव्हाण, जिल्हा प्रमुख शुभम भटकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा जयाताई बद्रे, निताताई तिवारी, सरपंच संगीता ताई बद्रे, पत्रकार राजु गायकवाड यांच्यासह गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत संघटनेचे उद्दिष्ट, कार्यपद्धती व सामाजिक कार्य यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच शिरजगाव कोरडे येथे अधिकृतपणे शाखा स्थापन करण्यात आली.