आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृअत संघ (इस्कॉन) संस्थापकाचार्य कृष्णकृपामुर्ती श्रील ए.सी.भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या आर्शीवादाने, धामणगाव रेल्वे शहरातील आरोही रिसॉर्ट येथील दामोदर दुलाल दास दिनेश बुधलानी .
यांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव २०२४ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे… हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामत्रांचे संकिर्तन करण्यात आले. त्यानंतर श्री भगवान कृष्ण यांची जन्म कथा श्रीमान आनंद चिन्मय प्रभुजी चिखली यांनी कथन केली.यानंतर भगवान श्रीकृष्णांना जलाभिषेक,दुग्धाभिषेक, दहीभिषेक, तुपभिषेक, मध व विविध फळांच्या रसाचा व फुलांचा अभिषेक सर्व भक्तांकडून करण्यात आला. याप्रसंगी बालगोपाळांनी कृष्ण, राधा यांच्या हुबेहुब वेशभुषा साकारून कार्यक्रमात प्रत्यक्ष जणु श्रीकृष्ण अवतरले असा भास होत होता.यामधे सृष्टी एंडोले,चैतन्य एंडोले, कार्तिक रिंढे, सृष्टी देशमुख,परी लाऊडकर, अमेय टेकाडे या बालक बालिकांनी सहभाग घेतला.
त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी संजय काळे प्रताप सिंगजी यादव प्रविण पोतदार ,दिलीप भागवत ,चेतनजी कोठारी,सौ. निलीमा बुधलानी सौ. शारदाताई साकुरे सौ. माधूरीताई साकुरे सौ. जयाताई भागवत सौ नेहा मुधडा सौ. श्रीवास माताजी यांच्यासह श्रीकृष्ण जन्माष्टमी, महामहोत्सवात धामणगाव शहरातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.